Wednesday, August 31, 2016

आई


बायको सतत आईवर आरोप करत होती..........

आणि

नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहन्यास सांगत होता...

पण बायको काही गप्प बसण्याचं नावच घेत नव्हती

ती  जोरजोरात ओरडून सांगत होती


"मी अंगठी टेबलवरच ठेवली होती
आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कुणीच् आलेलं नव्हतं..
अंगठी असो वा नसो ती आईनेच उचललीये"

गोष्ट जेव्हा पतिच्या सहनशक्तिच्या बाहेर गेली..
त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली ठेऊन दिली..

 तिन महिन्या पूर्वीच लग्न झालेलं होतं..



पत्नीला ती चापट सहन झाली नाही.ती घर सोडून चालली

आणि जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला....

 कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का??


तेव्हा पति ने उत्तर दिले

त्या उत्तराला ऐकून
दरवाजा मागे उभी असलेली आई हे ऐकून तिचे मन भरून आले

 पति ने पत्नी ला सांगितले..

"जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले

आई अजुबाजूच्या परिसरात झाड़ू मारुन थोड़े पैसे आनायची ज्यात एक वेळेचं
पोट भरायचं.


आई एका ताटात भाकर वाढायची

आणि

रिकाम्या डब्याला झाकुन् ठेवायचि
आणि म्हणायची

माझ्या भाकरी या डब्यात आहेत बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो


आई माझं पोट भरलय आता मला नाही खायचं.

आईने माझी उष्टी अर्धी भाकर खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं

आज मी दोन भाकरी कमवायच्या लायकिचा झालो

पण हे कसं विसरु की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं,


ती आई या स्तिथिला अशा अंगठी साठी भुकेलि असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही..

तू तर तिन महिन्यापासूनच माझ्या सोबत आहे.

मी तर आईच्या तपश्चर्यला 25 वर्षापासून बघितलय.😔



हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रु आले.

ति समजूच् शकत नव्हती की मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज फेड़तोय की
ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....✍🏻🤗

Tuesday, August 30, 2016

व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?

*"व्हॉटस अपवरील महत्वाचे संदेश सेव्ह कसे करावेत.?"
आजकाल व्हॉटस् अपवर दररोज हजारो संदेश येतात त्यातील काही *अतिमहत्वाचे लेख असतात, काही कविता व लेख मनाला स्पर्श करून जाणाऱ्या असतात, दैनंदिन जिवन सुखकर करणाऱ्या टिप्स असतात, एैतिहासिक माहिती असते, शेतीविषयक मार्गदर्शन असते, समाजाविषयी महत्वाचे संदेश असतात* इत्यादी गोष्टी आपणाला खूप आवडतात परंतु प्रबळ इच्छा असूनही आपण हे संदेश जतन करू शकत नाही किंवा प्रत्येक संदेश लिहून काढण्या इतपत वेळही आपल्याकडे नसतो...
याकरिता एक अत्यंत सोपा उपाय आहे. *Playstore* मधून *Notebooks* या नावाचे अॅप्लिकेशन इन्सटॉल करा अन् आपले बहुमोल संदेश कायमस्वरूपी जतन करा.
📚📒 *Notebooks हे कसे शोधावे..?*
Play store मध्ये जावून जसेच्या तसे Notebooks लिहून सर्च करा. _वेगवेगळ्या रंगाची एकावर एक ठेवलेली पाच पुस्तके व त्यांच्याआधाराने पिवळ्या रंगाचे एक पुस्तक उभे केले आहे (📚📒)हा Notebooks चा *आयकॉन* आहे_ केवळ असा आयकॉन असलेलेच Notebooks इन्सटॉल करा.
📚📒 *Notebooks मधे महत्वाचे संदेश कसे जतन करावेत..?*
Notebooks इन्सटॉल करून ओपन केल्यानंतर त्यामध्ये + Plus हे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करून आपण विषयानुसार आपणास आवश्यक तितक्या सिंगल नोटबुक तयार करू शकतो. त्यामध्ये १००० पर्यंत पेजेस घेता येतात. हव्या त्या डिझाईनचे कव्हर ठेवता येते. त्यांना विषयानुसार वेगवेगळी नावे द्यावेत उदा - ऐतिहासिक माहिती, महापुरुष, बोधकथा, प्रेरणादायी विचार, आरोग्य टिप्स, सुविचार इत्यादी इत्यादी आपल्या गरजेनुसार...
त्यानंतर वेळोवेळी व्हॉटस् अपवरील _आपले आवडते संदेश कॉफी करून त्या त्या विषयाच्या नोटबुक मध्ये पेस्ट करावेत.._
दररोज कॉफी पेस्ट करण्याइतपत आपल्याकडे वेळ नसेल तर ते महत्वाचे संदेश वाचता क्षणीच Star करून ठेवावेत व जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा हे Star केलेले संदेश Notebooks मध्ये विषयानुसार पेस्ट करावेत.
📚📒 *Whats app डिलीट झाले तर Notebooks मधील संदेश डिलीट होतात का..?*
नाही. Whats app व Notebooks ही दोन्ही वेगवेगळी अॅप्लिकेशन असल्या कारणाने Whats app डिलीट झाले तरी आपण Notebooks मध्ये जतन केलेला एकही संदेश डिलीट होत नाही...
📚📒 *मोबाईल बदलला किंवा चोरी झाला तरी Notebooks मध्ये जतन करून ठेवलेले जुने संदेश जसेच्या तसेच नविन मोबाईल मध्ये घेता येतात काय..?*
होय घेता येतात. आपला मोबाईल चोरीला गेला तरी चिंता करण्याचे कारण नाही आपण जतन केलेली सर्व माहिती जशीच्या तशी नविन मोबाईल मध्ये घेता येते..
यासाठी फार मेहनत करण्याची गरज नाही...
याकरिता दोन पद्धती आहेत..
1) *_ऑफलाईन बॅकअप_*
हा बॅकअप आपल्या मेमरी कार्ड (Local Storage) मध्ये घेता येतो. मोबाईल बदलतेवेळी नविन मोबाईल मध्ये आपण संग्रहित केलेले सर्व संदेश जसेच्या तसे घेता येतात..
दर दहा-बारा दिवसांनी Notebooks चा ऑफलाइन बॅकअप घ्यावा.
2) *_ऑनलाईन बॅकअप_*
हा बॅकअप घेण्यासाठी अापले Dropbox किंवा Google Drive अकाउंट हवे असते. कृपया हे अकाउंट तयार करावे. आपला मोबाईल चोरीला गेला असता आपण Notebooks मध्ये जतन करून ठेवलेली आपली सर्व माहिती नविन मोबाईल मध्ये जशीच्या तशी Restore करता येते. आपण नियमित ऑनलाईन बॅकअप घेतल्यास ऑफलाइन बॅकअप घेण्याची गरज नाही.
📚📒 *Notebooks चे इतर फायदे कोणते..?*
आपण आपल्या दैनंदिन व्यवहारातील हिशेब, कामाच्या याद्या, नियोजन, आपण लिहत असलेले महत्वाचे लेख आदी गोष्टी वेगवेगळ्या नावांच्या नोटबुक तयार करून त्यामध्ये लेखन करून कायमस्वरूपी जतन करू शकता.
📚📒📚📒📚📒📚📒📚📱📲📲📲📲📲📲📲📲📲
*हल्ली* व्हाट्सपवर गृपची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाकडे निदान ५० गृप तरी असेलच.. त्यामुळे एखादी पोस्ट ५० गृपवर *पाठवणे* म्हणजे मोठीच कसरत करावी लागते सोबतच वेळही खर्ची होतो...
परंतु आता व्हाट्सपने नवीन अपडेट मध्ये एकच पोस्ट एकाच वेळी अनेक गृपवर - कॉन्टॅक्ट वर फॉरवर्ड करण्याची *सुविधा* उपलब्ध करून दिली आहे...
यामुळे आपला *वेळ व श्रम* दोन्ही वाचेल, त्यासाठी...
*Thank you WhatsApp*
*________________*
♂♂♂♂♂♂♂♂★■◆●●●♂♂♂♂♂♂
*आज पर्यंत आपल्याला ग्रुप वर पोस्ट करायची असेल तर प्रत्येक ग्रुप ला जाऊन share करावे लागत होते पण व्हाटसप ने आता नवीन अपडेट आणले आहे त्या मध्ये आपणास आपली पोस्ट एकाच वेळी अनेक ग्रुप ला सहारे करता येणार आहेयासाठी आपणास आपल्या पोस्ट वर होल्ड करायचे आहे,होल्ड केल्यानन्तर वरच्या बाजूस बाणाचे

चिन्ह दिसेल त्यावर टच करा व त्यांनतर recent गृप व कॉन्टॅक्ट ची यादी येईल. ज्या गृपवर किंवा कॉन्टॅक्टला पोस्ट करायची आहे त्यावर टच आणि सेंड करा.
*पण एक लक्षात घ्या यासाठी आपण व्हाट्सअप चे beta user असणे गरजेचे आहे.
* *_त्यासाठी काही स्टेप्स आहेत त्यानुसार कृती करा_*
*प्ले स्टोअर मध्ये व्हाट्सप टाकून सर्च करा. पुढे व्हाटस अप बद्दल माहिती येईल. तेव्हा स्क्रीनच्या एकदम खालच्या बाजूला beta tester आहे त्याठिकाणी i am in वर क्लिक करा*
क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा, वेळ जास्त पण लागू शकतो काही वेळाने तुम्ही व्हाटसपचे बेटा टेस्टर झाले आहेत असा msg येईल त्यानंतर तुम्ही तुमचे whatasapp update करा त्यांनतर तुम्हला व्हाटसाप मध्य forward टू many ही सुविधा आलेली दिसेल,यातून तुम्ही एकाच वेळी अनेक ग्रुपला पोस्ट share करू शकता!!!

Friday, August 26, 2016

Every parent Must read once

35 Ways to Respect your children views and ways to know them in a better way. Must read
1. Put away your phone in their presence or avoid talking too much on phone when they r with you
2. Pay attention to what they 
are saying.
3. Accept their opinions.
4. Engage in their
conversations.
5. Look at them with respect.
6. Always praise them.
7. Share good news with them.
8. Avoid sharing bad news with
them.
9. Speak well of their friends
and loved ones to them.
10. Keep in remembrance the
good things they did.
11. If they repeat a story, listen
like it's the first time they
tell it.
12. Don't bring up painful
memories from the past.
13. Avoid side conversations in
their presence.
14. Sit respectfully around
them.
15. Don't belittle/criticize their
opinions and thoughts.
16. Avoid cutting them off when they speak.
17. Respect their age.
19. Accept their advice and
direction.
20. Give them the power of
leadership when they are
present.
21. Avoid raising your voice at them constantly, be very assertive but calmly
22. Avoid walking in front or
ahead of them.
23. Avoid eating before them without sharing with them
24. Avoid glaring at them.
25. Fill them with ur
appreciation even when
they don't think they
deserve it.
26. Avoid putting your feet up in front of them or sitting with your back to them.
27. Don't speak ill of them to
the point where others
speak ill of them too.
28. Keep them in prayers
always possible and teach them to pray
29. Avoid seeming bored or
tired of them in their
presence.
30. Avoid laughing at their
faults/mistakes.
31. Do a task before they ask
you to.
33. Choose your words carefully when speaking with them.
34. Call them by names they
like.
35. Make them your priority
above anything.
Children are parents treasure and their most precious gift on this land. They must have seen the world lesser than you but they see it in a different way which you need to appreciate. Listen to them and try giving them as much time as you can. These by moments are more precious than anything in this world.
Every parent Must read once.

Saturday, August 20, 2016

'पुरोगामी' होणे म्हणजे काय.??

'पुरोगामी' होणे म्हणजे काय.??
स्वतःला 'पुरोगामी' विचारांचे म्हणवणाऱ्या माझ्या तथाकथित मित्रांना,मैत्रिणींना माझे इतकेच सांगणे आहे कि, केवळ चार-चौघात आलो कि पुरोगामित्वाचे डोस देणे व मनातून वा घरात त्याच जुन्या बुरसटलेल्या विचाराचे पाईक असणे असे दुटप्पी वागणे आता बंद करा. बाहेर आल्यावर आम्ही कसे पुरोगामी विचाराचे? हे ओढून ताणून दाखवायचे नि घरात लग्न व शुभ कार्य असले कि, मुहूर्त पहायचे, पत्रिका बघायच्या, मंगळ-अमंगळ पहायचे, घरा-गाड्यांवर लिंबू-मिरच्या टांगायच्या तसेच केवळ ब्राह्मण वा खालच्या जातीतला आहे म्हणून समोरच्याला शिव्या घालताना स्वतः मात्र आपण 'क्षत्रिय किंवा वैश्य'(शेवटी चातुर्वाण्याचेच भाग)असल्याचा अवास्तव अभिमान बाळगायचा यालाच दुटप्पीपणा म्हणतात हे लक्षात घ्या.
भारतातील तथाकथित हिंदू धर्म हा मुळचा वैदिक धर्म आहे . तेव्हा हे जातीपातीचे अहंकार सोडून द्या अशाने तुमच्या पुरोगामित्वाचा बुरखा टराटर फाटला जातो हे तुमच्या गावीही नसते; पण आम्हाला ते दिसते, जाणवते. ऐकिवात असलेला दुतोंडी साप मी प्रत्यक्षात पाहिलेला नाही परंतु अशा लोकांकडे पाहिल्यास ते खरेच अस्तित्वात आहेत याची जाणीव होते.कुणी केवळ अमुक जातीचा वा धर्माचा म्हणून त्याचा राग वा कौतुक करू नका.
पुरोगामी विचार स्वीकारलेला किंवा "जुने जाऊ द्या मरणा लागुनी" म्हणत आधुनिकतेची कास धरून त्याप्रमाणे चालणारा, चांगले बदल घडवून आणणारा माणूस हा 'आमचा' असतो तोच सर्वांना 'आपला' वाटू लागतो. त्याला कोणती;जात नसते, कोणता धर्म नसतो तो केवळ 'माणूस'च असतो तुमच्या आमच्या सारखा
तेव्हा 'पुरोगामी' होणे म्हणजे काय??
तर
माणसाला 'माणसाची' ओळख देऊन त्याला'माणसा;सारखे'वागवणे होय, समानतावादी व विज्ञानवादी बनणे होय.
कुणाचा जाणूनबुजून द्वेष करणे नव्हे!!

एक सुट्टी घ्या

लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे
लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्रमाणे उडाणटप्पू वाटू शकतो. काही जणांची कार्यालयातील आपल्या अस्तित्वाबद्दल 'विशेष' कल्पना असते. एकदा माझ्या एका मित्राशी फोनवर बोलत होते. संवाद ऐका बरं " अगं चार चार ऑफिसर आहेत बँकेत पण माझ्यावरच कामाचा सगळा लोड पडतो."
"का? बाकीचे काही काम करत नाहीत?" मी विचारले...
"काही काम करत नाहीत गं ...आणि आमचा म्यानेजर पण काही बोलत नाही ." एकूणच माझ्या या मित्राला बँकेत केवळ हमी एकटाच कामाने मारतो आहे असे वाटत होते . " मी एक उपाय सुचवू का ?" मी विचारले .
" तीन आठवडे सुट्टी घे" मी म्हणाले.
"सुट्टी घेऊन काय करू? उगाच पर्यटन वगैरे सारखे पैसे घालवायचे सल्ले देऊ नकोस. " तो डाफरला .
"तीन आठवडे सुट्टी घे. घरी 'पडे रहो' कर. लायब्ररी मधून फिल्म च्या सी डीज आण , पुस्तके वाच. पण या तीन आठवड्यात एक काम करायचे ...ते म्हणजे एकदाही बँकेच्या जवळपास ही जायचे नाही. "
"त्याने काय होईल?"
"तीन आठवड्याने तू गेल्यावर तुला कळेल की तू नव्हतास तरी बँक चालू राहिली. बंद पडली नाही . तुझ्या एकट्या मुळे बँक चालते असा तुझा समज एकदा दूर झाला की तुझे कामाचे प्रेशर पण गायब होईल बघ " माझ्या या फुकटच्या सल्ल्याचे त्याने काय केले माहित नाही...पण निदान नंतर मी कधी त्याचे रडगाणे ऐकले नाही. आपल्यामुळे ऑफिस चालते किंवा मी गेलो नाही तर फार कामे बंद पडतील असा एक गोड गैरसमज बरेच जण करून घेतात आणि मग सुट्टी नाकारून स्वतःलाच शिक्षा करत राहतात.
माझे एक परिचित आहेत. कधी त्यांनी सुट्टी घेतलेली असली तर दृश्य बघावे. दर १५-२० मिनिटांनी कुण्या तरी सहकार्याला फोने करून "काय रे काय चालले आहे ?" असे म्हणून पिडत असतात. आपल्या पाठीमागे ऑफिस मध्ये काही झाले आणि आपल्याला माहित नाही असे होऊ नये म्हणून ही धडपड .म्हणजे सुट्टी घेऊनही तिचा आनंद काही घेता येत नाही. असुरक्षितातेची भावना हे पण काही जणाच्या सुट्टी न घेण्या मागचे कारण असू शकते .
पाश्चात्य देशातील काही चांगली व्यवस्थापन तत्त्वे आपण उचलली पाहिजेत .तिथे सुट्ट्या कमी असल्या तरी त्या घेतल्याच पाहिजेत असा दंडक असतो .रजा विकणे , साठवून ठेवणे , पेन्शनीत वर्ग करणे असले प्रकार नसतात .माणसाला विश्रांतीची गरज असते आणि त्या साठी रजा ही घेतलीच पाहिजे असा स्पष्ट आग्रह तिथे असतो . आपले म्हणजे असे आहे की व्यवस्थापकांनी त्यांच्या सोयीच्या आणि पगार जास्तीत जास्ती वसूल कसा करता येईल अशाच गोष्टी उचलल्या आहेत बाकीच्या नुसत्या गप्पा. नारायण मूर्तीचे एक भाषण मेल अधून मधून फोरवर्ड होत असते. त्यात त्यांनी लोकांना वेळेवर घरी जा, कुटुंबासाठी वेळ काढा , इत्यादी इत्यादी उपदेश केला आहे. आपण लोक नुसतीच मेल वाचतो, "कसले स्पष्ट बोलतात हो" म्हणून त्यांचे कौतुक करतो. आणि निदान रात्री आठ वाजता तरी निघायला हवे आता असा फुसका निश्चय करतो.
सांगायचा मुद्दा काय की आपण काही तरी लंगड्या सबबी सांगून रजा घेण्याचे टाळतो . कुटुंब आणि स्वतःला जो वेळ द्यायचा तो देत नाही.कशासाठी हा सगळा खेळ मांडला आहे ते कळत नाही त्याला आणि मग आयुष्यावर रागवत राहतो. रागावलेल्या माणसाचे आणि निर्मिती क्षमतेचे वाकडे असते. चिडलेला, थकलेला माणूस गाणे गाऊ शकत नाही.....
आयुष्याचे संगीत शोधा...जगण्याची प्रेरणा शोधा...
ऐका...
एक सुट्टी घ्या.
Forwarded post

Thursday, August 18, 2016

जिवलग"* परत कधीच दिसत नाही

जरुर वाचा
👌👌👌👌👌👌👌
आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेंव्हा शेवट होईल तेंव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्या सोबत नेता येणार नाही.!
मग जीवनात खुप काटकसर कशासाठी करायची ? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे ज्या *गोष्टींतुन आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.*
शक्य असेल तेवढा दानधर्म करायला हवा. मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी संपत्ती गोळा करुन साठवून ठेवायची गरज नाही. तसे केले तर पुढची काही वर्षे स्वतःकाही न करता ते नुसते बसून खातील आणि आपल्या मृत्युची वाट बघतील.
*आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळीच चिंता करु नका. कारण आपला देह जेंव्हा मातीत मिसळून जाईल तेंव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय ?* जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशांचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल.!
*तुमच्या मुलांची खुप काळजी करु नका. त्यांना स्वत:चा मार्ग निवडू द्या*. स्वतःचे भविष्य घडवू द्या. त्यांच्या ईच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका.
*मुलांवर प्रेम करा*, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तुही द्या. मात्र काही खर्च स्वतःवर, स्वतःच्या आवडीनिवडीवर करा.
*जन्मापासून मृत्युपर्यंत नूसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही,* हे देखील लक्षात ठेवा.
तुम्ही कदाचित आपल्या चाळीशीत असाल, पन्नांशीत किंवा साठीत, आरोग्याची हेळसांड करुन पैसे कमवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजून सुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही.
या वयात प्रत्येकापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमवणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल.? तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमिन असली तरी तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते ? तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते !
एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या.
आणखी एक गोष्ट तुमचा स्वभाव खेळकर, उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल, आणि तुम्ही कायम प्रफुल्लीत असाल, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आहे उदात्त आहे त्याकडे पहा. त्याची जपणूक करा आणि हो! तुमच्या मित्रांना कधीही विसरु नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण रहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल.
मित्र नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो ... *"आयुष्य खुप कमी आहे, ते आनंदाने जगा..!*
प्रेम मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षणभंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
डोंगराआड गेलेला सूर्य
परत दिसू शकतो,
पण
माथ्या आड गेलेला
*"जिवलग"*
परत कधीच दिसत नाही" ...........
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
Forwarded post

Wednesday, August 10, 2016

फक्त तुम्ही खचुन जावु नका.


शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट
परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या
पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण
अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत
नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच
काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग
वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC
किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश
पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले
नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती
मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc
झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन
शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल
इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी
घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना
लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली
असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात
शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण
नाक मुरडतात.
.
.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना
तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी
नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज
वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला
विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं
शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर
साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे
टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा
दुष्काळ पडला तर विचारुच नका.
.
.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला
एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला
आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा
तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन.
शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं
कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली
पोरं काय करणार?
.
.
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले
पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला
जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा
किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे
लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु
घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी
अवस्था होते त्यांची.
.
.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त
गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच
समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा
विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी
पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या
देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले
पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण
फक्त तुम्ही खचुन जावु नका.
---