नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर
मेसेज येतो ...
.
"हाय, गुड मॉर्निंग डियर"
(मेसेज फ्रॉम बेबी)
सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते. विचारात पडते,
ही "बेबी" कोण आता ?
.
नवरा बाथरूममधून आल्यावर बायको त्याला कुण्या
बेबीचा मेसेज आल्याचे सांगते. नवरा हसतो. आणि
मोबाईल घेऊन रिप्लाय करतो,
"हाय बेबी, हाऊ आर
यु ?" आणि आपल्या कामाला लागतो.
तो रिप्लाय
देखील बायको पाहते.
मग दिवसभर डोक्यात विचार
सुरू होतात, कोण असेल ही बेबी ?
.
संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते,
"ही बेबी कोण आहे हो ?"
नवरा केवळ हसतो आणि उत्तरं न देता आपल्या
कामाला लागतो.
असेच एक दोन दिवस जातात.
पुन्हा एके सकाळी मेसेज येतो,
.
"हाय, आज तरी भेटणार का ?
खूप आठवण
येतेय तुझी" (मेसेज फ्रॉम बेबी)
.
हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो. अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे,
नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळे पाहून बायकोचा संशय वाढायचा. आणि एकेदिवशी
नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात.
त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते.
दोघात कडाक्याचे भांडण होते.
तिच्या मनात अढी बसलेली त्यात भांडण पेटलेले.
त्या भरात
बायको त्या दिवशी नवरा ऑफिसला गेल्यावर
त्याच्यासाठी एक चिट्ठी ठेवते "मी घर सोडून
माहेरी जातेय, कायमची"
.
****
नवरा घरी आल्यावर चिट्ठी वाचून सुन्न होतो !!
***
पंधरा दिवस जातात. आणि एकेदिवशी बायको
आपल्या गावातच असलेल्या ज्या माहेरी राहत
असते, त्या घराची बेल वाजते. बायकोच दार उघडते.
दारात दहा वर्षाची एक अतिशय गोड मुलगी उभी !!
ती विचारते, "अमुकच्या मिसेस तुम्हीच न ?"
बायको "हो" म्हटल्यावर ती मुलगी तिच्या
हातातले एक पत्र बायकोला देते. बायको पत्र वाचू
लागते.
****
"प्रिय सखी, ज्या "बेबी"वरून इतके वादळ उठले आणि
तू घर सोडून गेलीस, तीच ही "बेबी" आहे. जिने आता
तुला हे पत्र दिलेय. अनाथ आश्रमातील ही गोड
मुलगी. हिच्याच सोबत मी बोलायचो, सिनेमाला
जायचो. जेव्हा तू पहिल्यांदा विचारलेस कि "हे
बेबी कोण आहे?" तेव्हा मुद्दाम सांगितले नाही.
म्हटलं पाहूया, जरा गंमत करूया. मात्र तुझा "बेबी
संशय" वाढतच गेला. आणि तिथेच विश्वासाला तडा
गेला. तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट
घडवणार होतो. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत
नव्हतीस. आणि रागाच्या भरात निघून गेलीस"
आणि हो, अजून एक, ही जी बेबी तुझ्या समोर उभी
आहे न, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी
आहे"
थांब ! दचकू नकोस. शांतपणे पुढचे वाच !!
आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षे आधीची घटना. तू
कॉलेजात लास्ट इयरला होतीस. तिथल्या एका
प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी
बोलावून तुला कॉफीतून गुंगीचं औषध दिलेलं आणि
नंतर "नको ते कृत्य" केलेलं. तुझी चूक नसतानाही
निसर्गाने मात्र काम केले. नंतर प्रयत्न करूनही
अबॉर्शन घडलं नाही. इभ्रतीचा बोभाटा नको
म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच झाकलेलं.
तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न
होता "नको" ते बाळ जन्मल. पुढे तुझ्या वैवाहिक
जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडलांनी
गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं !
तेच बाळ म्हणजे ही बेबी !! वाटल्यास तिच्या
डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे
जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला
असशील. किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे.
***
(बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील
तीळ पाहते. तीळ दिसताच ती मनातून कोसळते.
डोळे भरून आलेले. पण पत्र अजून बाकी असतं. ती पुढे
वाचायला सुरुवात करते )
***
"आता हे सगळं मला कस माहित ?
तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहवून आपल्या लग्नाच्या एक
महिना आधी मला भेटून हे सांगितलं व वाटल्यास
अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता, सुचवलं.
तरीही मी तुला स्वीकारलं.
कारण झाल्या प्रकारात तुझी चूक
काहीच नव्हती. आणि आपले लग्न झाले. पण मीच अधून मधून त्या बेबीला जाऊन भेटायचो. तिच्या सहवासात छान वाटायचे.
लळा लावला होता पोरीने.
.
बास !! माझे सांगून संपलंय सगळं !
आता विचार कर
आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच ग्यालरीत ये"
.
सदैव तुझाच xxxxx "
.
****
बायको ताडकन धावत धावत ग्यालरीत जाते.
खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख !!
आणि इकडे हिच्या डोळ्यात अश्रूचा महापूर !!
.
****
कारण कोणतेही असो,
दोघांमध्ये संशयाला कधीच
थारा देऊ नका !!
शांतपणे समोरासमोर बसून निरसन
करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा.
कारण जगात "संशय" हा एकमेव असा रोग आहे,
ज्यावर अद्याप औषध निघालेले नाही !! त्यावर औषध एकच ...
नात्यात वाद नको संवाद हवा